60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वीजपुरवठा


SHARE

मुंबई - चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपटी , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवास स्थान, राजगृह, आंबेडकर कॉलेज, इत्यादी ठिकाणी 251 अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे देखील बसवण्यात आलेत. वीज पुरवठा अखंडित ठेवण्याकरता 500 केव्हीए क्षमतेचा एक जनरेटर कॅडेल रोड उपकेंद्र येथे ठेवण्यात आला आहे. तर 100 के व्ही ए क्षमतेचे 2 जनरेटर्स चैत्य भूमी आणि शिवाजी पार्क येथे ठेवण्यात आलंय. दादर चौपाटी, महापौर निवास आणि ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी 3 सर्च लाइट्स बसवले जाणार आहेत. तसेच धर्मादाय वीज दराने एक खिडकी या योजनेंतर्गत शिवाजी पार्क मैदानात तंबूत रहाणाऱ्यांसाठी तात्पुरती मीटर जोडणी करून देण्यात येणार आहे. याशिवया प्रवर्तन पथकही तैनात केले जाणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरता बेस्टने उत्तम प्रकारे विजेची सोय केली असल्याची माहीती गुरुवारी झालेल्या पत्रकार परीषदेत बेस्टच्या वतीनं देण्यात आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या