Advertisement

कशासाठी शिवानीनं मागितली किशोरींची माफी?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानी आणि किशोरीताईचं कडाक्याचं झालेलं भांडण अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर आता मात्र सगळं सुरळीत सुरू आहे. घरामध्ये असं काय घडलं ज्यामुळं किशोरी शहाणे यांना अश्रू अनावर झाले आणि शिवानीनं किशोरीताईची माफी मागितली

कशासाठी शिवानीनं मागितली किशोरींची माफी?
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानी आणि किशोरीताईचं कडाक्याचं झालेलं भांडण अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर आता मात्र सगळं सुरळीत सुरू आहे. घरामध्ये असं काय घडलं ज्यामुळं किशोरी शहाणे यांना अश्रू अनावर झाले आणि शिवानीनं किशोरीताईची माफी मागितली. शिवानीचं म्हणणं होतं की, तुम्ही म्हणाल्या चला आता तर मला वाटलं कि तुम्ही बऱ्या आहात. त्यावर किशोरी म्हणाल्या की, तू सारखं विचारत होतीस म्हणून मी बोलले. शिवानीनं सांगितली मी मज्जा करत होते, नको करू का मी तुमच्यासोबत मज्जा? मी नाही करणार. त्यावर किशोरी म्हणाल्या की, दिसायला खूप वाईट दिसलं. कारण पोट दुखत आहे. त्यावर शिवानीचं म्हणणं होतं की, तुम्ही नसतं म्हटलं तर मी नसतं बोलले, मी इतकी इनह्युमन नाही आहे.


कुटुंबं वधू-वर सूचक मंडळात

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सात बारा हे साप्ताहिक कार्य सुरू आहे. घरामध्ये बिग बॉस सदस्यांवर लक्झरी बजेट कार्य सोपवणार आहेत. या कार्याचं स्वरूप ऐकताच सदस्यांना खूप गंमत वाटली. बिग बॉस मराठीच्या घरातील दोन सदस्य वीणा आणि शिव यांच्यातील मैत्री सुंदर आणि प्रेरणादायी आहे. दोन्ही सदस्य एकमेकांची काळजी घेतात आणि प्रेमानं एकमेकांशी बोलतात, पण यांच्यात खटके देखील उडतात आणि मग मैत्रीत अडथळा येतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कार्यामध्ये नेमून दिलेली दोन कुटुंबं वधू-वर सूचक मंडळात जाणार आहेत. त्यामुळं या वधू– वर सूचक मंडळात काय घडणार? ते पहायचं आहे.


शिवानीला रडू कोसळलं

यापूर्वीच्या भागामध्ये नेहा आणि टीम बी मधील सदस्यांमध्ये बराच वाद झाला. नेहा आणि शिवानीनं केलेल्या युक्तीची प्रशंसा देखील बिग बॉस यांनी केली. किशोरी आणि नेहामध्ये फुलं मोजण्यावरून आणि मार्क्स देण्यावरून वाद झाला. शिवानीला सुरु टास्कमध्ये रडू कोसळलं, कारण ज्याप्रकारे सदस्य टास्क खेळत होते त्याची भीती वाटणं सहाजिक होतं. तर शिवचा हीना आणि आरोहबरोबर वाद झाला. आता या टास्कमध्ये पुढं काय होणार? कोणती टीम बाजी मारणार? हे समजणार आहे.


हेही वाचा  -

टकाटक'ची सक्सेस पार्टी! नक्की बघा, कोण काय म्हणालं

टोरंटोमध्येही आकाश होणार गुलाबी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा