Advertisement

'बिग बॉस'मध्ये लागणार मिठाईचं दुकान

मराठी 'बिग बॉस'च्या दुसऱ्या सीझनमधील खेळ दिवसेंदिवस अधिकच रंगू लागला आहे. मागच्या आठवड्यात 'चोर बाजार' भरल्यानंतर आता 'बिग बॉस'मध्ये दिठाईचं दुकानही लागणार आहे.

'बिग बॉस'मध्ये लागणार मिठाईचं दुकान
SHARES

मराठी 'बिग बॉस'च्या दुसऱ्या सीझनमधील खेळ दिवसेंदिवस अधिकच रंगू लागला आहे. मागच्या आठवड्यात 'चोर बाजार' भरल्यानंतर आता 'बिग बॉस'मध्ये मिठाईचं दुकानही लागणार आहे.


मैथिली जावकर एलिमिनेट 

'बिग बॉस'चा खेळ खरोखर अनोखा आहे. यातील प्रत्येक टास्क खूप महत्त्वाचा असून, सदस्याचं अंतरंग उलगडणारा आहे. 'बिग बॉस' मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा खेळ आता पंधराव्या दिवसापर्यंत येऊन पोहोचला आहे. 'बिग बॉस'च्या घरामधून काल सिझन २ मध्ये एलिमिनेट होणारी मैथिली जावकर ही पहिली सदस्या ठरली आहे. मैथिलीनंतर या आठवड्यामध्ये घरातील उरलेले सदस्य कोणाला नॉमिनेट करणार? आणि प्रेक्षक कोणाला वाचवणार? हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


बिग बॉस नाराज

त्यासोबतच या घरातील या आठवड्यातील टास्कही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे. 'बिग बॉस'च्या घरातील सदस्य नियमांचं वारंवार उल्लंघन करत असल्यानं आज घरातील सदस्यांवर 'बिग बॉस' यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणताही नियम न मोडणं हाच 'बिग बॉस'च्या घराचा महत्वाचा नियम आहे. 'बिग बॉस' यांनी वारंवार सूचना देऊनही सदस्यांनी नियम मोडले. जसं मराठी भाषेचाच वापर करणं, माईक घालून घरामध्ये वावरणं, कुजबुज न करणं, 'बिग बॉस'च्या आदेशानंतरही लिव्हिंग एरियामध्ये जमण्यास उशीर करणं, किंवा दिवसा न झोपणं. 


सदस्यांना शिक्षा

घरातील सदस्यांनी ही गोष्ट गांभीर्यानं न घेतल्यानं आज सगळे सदस्य 'बिग बॉस' यांनी दिलेल्या शिक्षेस पात्र ठरणार आहेत. आता 'बिग बॉस' सदस्यांना कोणती शिक्षा देतात ते आज समजेलच. याचसोबत आज सदस्य तिसऱ्या आठवड्यामध्ये पदार्पण करत आहेत. नियमभंगामुळं सदस्यांनी कॅप्टन्सीमुळं मिळणारी इम्युनिटी गमवली आहे. 'बिग बॉस' मराठीच्या घरात आज साप्ताहिक नॉमिनेशन आणि कॅप्टनसी कार्य रंगणार आहे. 'बिग बॉस मिठाईवाला' हे नॉमिनेशन कार्य रंगणार असून, यामध्ये प्रत्येक सदस्यानं घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी दोन सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे.



हेही वाचा-

ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन

अबब! चरण-एनटीआरचे ४५ कोटींचे फाइट सिक्वेन्स




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा