गणपती विशेष ‘दक्षता’ अंकाचे प्रकाशन

 Mumbai
गणपती विशेष ‘दक्षता’ अंकाचे प्रकाशन
Mumbai  -  

मुंबई पोलिसांच्या गणपती विशेष ‘दक्षता’ अंकाचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या अंकामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मान्यवरांचे लेख छापण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांतर्फे मागील ४० वर्षांपासून ‘दक्षता’ या मराठी मासिकाचे प्रकाशन होत आहे. या प्रकाशन सोहळ्याला दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण), रणजीत पाटील, गृह राज्यमंत्री (शहर), सतीश माथूर, पोलीस महासंचालक, दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त आणि मासिकाच्या कायदेशीर सल्लागार अॅड. स्मिता राहुल चिपळूणकर आदी उपस्थित होते.


मराठी साहित्यातील मानाचे मासिक

गेल्या ४० वर्षांपासून प्रकाशित होत असलेले दक्षता हे मासिक मराठी साहित्यातील मानाचे मासिक समजले जाते. या मासिकात गुन्हेविषयक लेख, गुन्हे अन्वेषण इत्यादी विषयांचा अंतर्भाव असतो. प्रासंगिक विषयांबरोबरच सण-उत्सवांवर आधारीत विषयांचाही या मासिकात समावेश असतो.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Loading Comments