भागोजी किर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

 Mumbai
भागोजी किर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

दादर - शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीसाठी भुखंड दान करणारे दानवीर, कर्मवीर, हिंदुत्व आणि मानवतेचे पुजारी अशी ओळख असलेले भागोजी कीर यांची 24 फेब्रुवारीला पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने दादर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी बंगाल केमिकल्स (सेंचुरी बाजारासमोर) प्रभादेवी येथून पदयात्रा काढण्यात आली.

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे निलेश किसन कनगुटकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Loading Comments