Advertisement

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून दया बेनची एक्झिट?

तारक मेहता का उल्टा चश्मा फेम दया बेन अर्थात दिशा वकानीनं मालिकेला राम राम ठोकल्याची चर्चा असून यासंबंधीत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु दिशाने मालिका सोडल्याच्या चर्चेला उधाण आलं असून दया बेनच्या यापुढे चाहत्यांना दिसणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून दया बेनची एक्झिट?
SHARES

सब टिव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' च्या चाहत्यांसाठी, त्यातही 'टप्पू की मम्मी' अर्थात दया बेनच्या चाहत्यांसाठी एक बॅडन्यूज आहे. तुमची आवडती 'टप्पू की मम्मी' म्हणजेच दया बेन यापुढे तुम्हाला तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये दिसणार नाही. हो, हे खरं आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा फेम दया बेन अर्थात दिशा वकानीनं मालिकेला राम राम ठोकल्याची चर्चा असून यासंबंधीत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु दिशाने मालिका सोडल्याच्या चर्चेला उधाण आलं असून दया बेनच्या यापुढे चाहत्यांना दिसणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 


चाहत्यांची निराशा

टिव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका 'तारका मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील दया बेनची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री दिशा वकानी गेल्या कित्येक वर्षापासून साकारत आहे. मात्र २०१७ साली दिशा गरोदर असल्यानं ती काही काळ मालिकेपासून दूर राहिली. या मालिकेमुळं घराघरात टपू की मम्मी या नावानं प्रसिद्ध झालेली दिशानं ३० नोव्हेंबर २०१७ रोजी मुलीला जन्म दिला. यानंतर काही महिन्यांनी दिशा मालिकेत परतेल अशी आशा प्रत्येकाला वाटत होती. मात्र दिशानं प्रसुतीकाळाची रजा वाढवून घेतल्यानं अनेक चाहत्यांची निराशा झाली. 


निर्मात्यांच्या प्रयत्नांना अपयश

तारक मेहता का उल्टा चश्मा आणि दया बेन असं समीकरण असल्यानं, मोठ्या संख्येनं प्रेक्षक दया बेनसाठीच ही मालिका पाहतात. त्यामुळं दिशाला म्हणजेच दया बेनच्या भुमिकेशिवाय मालिका सुरू ठेवणं निर्माते व दिग्दर्शकांना शक्य नव्हते. त्यामुळं त्यांनी दिशाच्या घरी जाऊन शुटींग करण्यास सुरूवात केली. परंतु वारंवार घरी जाऊन शुटींग करणं शक्य नसल्यानं दिशानं सेटवर येऊन शुटींग करावं यासाठी निर्मात्यांनी तिची अनेकदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु दिशा मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं निर्मात्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला.


मालिका करणार का?

दरम्यानं दिशानं निर्मात्यांसमोर शुटींगसाठी वेळेसह पैशासंदर्भात काही अटी ठेवल्या होत्या, परंतु या अटी निर्मात्यांना परवडणाऱ्या नव्हत्या. याबाबत गेल्या काही दिवसांपासून निर्माते व दिशामध्ये चर्चा सुरु होती. मात्र या चर्चेतून काही मार्ग निघत नसल्यानं, शेवटी नाईलाज म्हणून निर्मात्यांनी दिशासोबतचा करार संपवल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यासंबंधीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसल्यानं दिशा ही मालिका करणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. 



हेही वाचा

हार्दिक-के. एल राहुलच्या वादावर करण जोहरनं सोडलं मौन

‘घाडगे & सून’ या मालिकेत आऊंची एंट्री



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा