‘घाडगे & सून’ या मालिकेत आऊंची एंट्री

कधी खाष्ट सासू तर कधी प्रेमळ आईच्या भूमिकेत दिसलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आता पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत.

‘घाडगे & सून’ या मालिकेत आऊंची एंट्री
SHARES

कधी खाष्ट सासू तर कधी प्रेमळ आईच्या भूमिकेत दिसलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आता पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत. चित्रपटसृष्टीत 'आऊ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उषा नाडकर्णी यांची ‘घाडगे & सून’ या मालिकेत एंट्री होणार आहे.


घरामध्ये विभागणी

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘घाडगे & सून’ या मालिकेमध्ये मागील काही दिवसांपासून बऱ्याच नाट्यमय घटना घडत आहेत. मालिकेमध्ये घराची विभागणी झाली आहे. अक्षय आणि कियारा घाडगे सदनमध्ये परतल्यानंतर अमृता घर सोडणार असं सांगते. यामुळे अण्णा आणि माई अमृताला संपत्तीमधला काही हिस्सा द्यावा असं म्हणत वसुधा भांडणाची ठिणगी टाकते. यानंतर घरामध्ये विभागणी झाल्याचं आजवरच्या भागांमध्ये दाखवण्यात आलं आहे.


उषा नाडकर्णी महत्त्वपूर्ण भुमिकेत

इतकी वर्ष जपलेलं हे कुटुंब अचानक तुटलं हे माईना सहन न झाल्याने माई आणि अण्णा पूर्णपणे खचून जातात. आता अमृता हा नात्यांचा गुंता कसा सोडवणार ? कसं घराला सावरणार ? अक्षय तिची मदत कशी करणार ? हे पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. अशातच मालिकेच्या कथानकाने नवं वळण घेतल्याने उषा नाडकर्णी एका महत्वपूर्ण भुमिकेमध्ये दिसणार आहेत. 


आऊच्या येण्यानं घाडगे कुटुंब एकत्र?

बऱ्याच दिवसानंतर म्हणजेच ‘बिग बॉस’नंतर आऊ पुन्हा एकदा मराठी मालिकेमध्ये दिसणार आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात त्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम लाभलं, त्यामुळे या मालिकेमधील त्या कशाप्रकारच्या भूमिकेत दिसणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. घाडगे सदनमध्ये आऊ माईची चुलत सासू बनून एन्ट्री करणार आहेत. मालिकेत सध्या त्यांच्या स्वागताची लगबग सुरु आहे. कियारा आणि अक्षयचं लग्न झाल्याची माहिती येणाऱ्या पाहुण्याला नसल्यानं पुन्हा एकदा साडी आणि मंगळसूत्र घातलेली अमृता प्रेक्षकांना दिसणार आहे. आऊच्या येण्यानं विभक्त झालेलं घाडगे कुटुंब एकत्र येईल का ? या प्रश्नाचं उत्तर मालिकेच्या पुढील भागांमध्ये मिळेल.हेही वाचा -

थुकरटवाडीत विशिकाच्या लग्नाचा निषेध!

संदीपने काढलं 'डोंबिवली रिटर्न' तिकीट!संबंधित विषय