Advertisement

नेहा-शिवानीच्या वादामागचं कारण काय?

बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि वाद यांचा कायम पाठशिवणीचा खेळ कायम सुरू असतो. त्यामुळंच एखादा नवीन टास्क मिळाला की लहान सहान का होईना वाद होतातच, पण नेहा-शिवानीच्या वादामागचं कारण काय? ते समजत नाही.

नेहा-शिवानीच्या वादामागचं कारण काय?
SHARES

बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि वाद यांचा कायम पाठशिवणीचा खेळ कायम सुरू असतो. त्यामुळंच एखादा नवीन टास्क मिळाला की लहान सहान का होईना वाद होतातच, पण नेहा-शिवानीच्या वादामागचं कारण काय? ते समजत नाही.


दोघींना मोठा धक्का

बिग बॉस मराठीच्या घराचा खेळच न्यारा आहे. इथं रोज नाती बदलताना दिसतात. मित्र कधी वैरी होईल हे सांगता येत नाही. एखाद्याला कधी कुठली गोष्ट खटकेल? कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटेल आणि दुखवला जाईल? गैरसमज होईल? हे सांगता येत नाही. काही दिवसाआधी शिवानीनं नेहाशी न बोलण्याचा निर्णय घेतला होता. जितकं काम असेल तितकंच बोलायचं. जी मैत्री असेल ती बाहेर निभवायची या घरामध्ये नाही, पण अचानक माधवच्या घरामधून जाण्यानं दोघींना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांनी ठरवलं आता भांडायचं नाही. 


मैत्री तुटण्याची परिस्थिती 

माधवच्या जाण्यामुळं बसलेल्या धक्क्यातून एकमेकींना सावरत आपण दोघीच आहोत एकमेकांना आणि बरंच काही त्या बोलल्या, पण आता मात्र पुन्हा एकदा या दोघींमधील मैत्री तुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवानीला नेहा असं काय बोलली ज्याचा तिला खूप राग आला. यावेळेस शिवानीनं अनेक गोष्टी नेहाला बोलून दाखावल्या. मनात काहीच ठेवलं नाही. आजवर ती मैत्रीखातर गप्प बसायची. काही न पटणाऱ्या गोष्टींवरही व्यक्त होत नसायची, पण आता नाही. तिला खटकणाऱ्या न पटणाऱ्या ज्या गोष्टींचा तिला राग येतो त्या सगळ्या तिनं नेहाला सांगितल्या.


दुसऱ्यांना राग येतो

शिवानी म्हणाली की, जसा तिला राग येतो तसा दुसऱ्यांना देखील राग येतो. तिला एका विशिष्ट पध्दतीनं कोणी बोलल की त्रास होतो. सगळ्यांसमोर तू मला असं नाही बोलू शकत नेहा. त्यावर किशोरी म्हणाल्या की, तुमच्या दोघींच्या मैत्रीची मी मिसाल देत होते. त्यावर शिवानी म्हणाली की, याची काही गरज नाही. नेहाचं म्हणणं होतं की, मला काही फरक पडत नाही. मी हजार वेळा जाईन तिच्याशी बोलायला नंतरसुद्धा. त्यावर शिवानी म्हणाली की, अजिबात यायची गरज नाही. याने लोकांना दाखवशील की बघा मी किती चांगली आहे. हेच केलस तू माधवच्याबाबतीत. 


वाद वाढतच गेला

नेहाचं म्हणणं होतं की, मला यावर काहीच बोलायचं नाही. त्यानंतर शिवानी–नेहामधील वाद वाढतच गेला. शिवानी म्हणाली की, तुझ्याकडं बोलायला काही नाही. त्यावर नेहाचा आवाज चढला आणि ती म्हणाली की, मला माहित आहे मी काय केलं आहे. माझ्या आणि माधवबद्दल तू काही बोलू नकोस. यावर शिवानी म्हणाली की, म्हणून तो बाहेर गेला. सारखं बोलायला लावल तू त्याला. रडायचं नाटक केलंस, मलाच तुम्ही किती बोलता, माझंच कसं खरं आहे, मी किती बिचारी आहे, किती बोलतो मला माधव हे चित्र तू बनवलंस नेहा. हा वाद कुठवर जाईल? यावर नेहाचं म्हणणं काय असेल? ते पहायचं आहे.



हेही वाचा  -

'गोंद्या'साठी पल्लवी बनली दुर्गाबाई चापेकर

प्रथमेशच्या 'खिचिक'चा टीजर पाहिला का?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा