Advertisement

प्रथमेशच्या 'खिचिक'चा टीजर पाहिला का?

मागील महिन्याभरापासून प्रथमेश परबचा 'टकाटक' हा मराठी चित्रपट तिकीटबारीवर धमाल करत आहे. अशातच प्रथमेशच्या 'खिचीक' या आगामी चित्रपटाचा टीजरही प्रदर्शित झाला आहे.

प्रथमेशच्या 'खिचिक'चा टीजर पाहिला का?
SHARES

मागील महिन्याभरापासून प्रथमेश परबचा 'टकाटक' हा मराठी चित्रपट तिकीटबारीवर धमाल करत आहे. अशातच प्रथमेशच्या 'खिचीक' या आगामी चित्रपटाचा टीजरही प्रदर्शित झाला आहे.

जून अखेरीस रिलीज झालेला आणि प्रथमेशची मुख्य भूमिका असलेल्या 'टकाटक' या अॅडल्ट सिनेमानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. या सिनेमानं बॅाक्स आॅफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेतल्यानंतर आता प्रथमेशच्या आगामी चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. शीर्षकापासूनच वेगळेपण असलेल्या 'खिचिक' या चित्रपटात हळव्या नात्याची गोष्ट पहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, रंजक कथा चित्रपटातून उलगलणार असल्याचं या टीजरमधून जाणवत आहे. 

प्रीतम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. 'खिचीक'च्या टीजरमध्ये प्रथमेशचा एक नवीनच लुक पहायला मिळतो. आजवर दगडू म्हणून ओळखला जाणारा प्रथमेश आता 'टकाटक'मध्ये ठोक्याच्या रूपात लोकप्रिय झाला आहे. 'खिचिक'मधील प्रथमेशचा लुक त्याच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा अगदी हटके आहे. या चित्रपटात लांब केस आणि फ्रेंच कट दाढीतील प्रथमेश प्रेक्षकांना भेटणार आहे. या चित्रपटाच्या टीजरमध्ये पाठमोरी जाणारी मुलगी, तिच्या हातातून पडणारा कागदाचा बोळा आणि त्यानंतर 'मी चाललो तिच्याकडे, सय वाजवली गिटार आता' हा संवाद येतो. 

त्यामुळं 'खिचीक'च्या टीजरमधून ही भावस्पर्शी कथा असेल असं म्हणता येईल. कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर पराग जांभुळे, अमितकुमार बिडाला चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सचिन दुबाले पाटील हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. 

https://youtu.be/-HCEBBKJor0हेही वाचा -

Movie Review: लैंगिक धडे देत बोलायलाही शिकवणारा 'शफाखाना

तुमच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरला आहेत 'यांचे' आवाजसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा