Advertisement

'गोंद्या'साठी पल्लवी बनली दुर्गाबाई चापेकर

आपल्यालाही एखादी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळावी आणि त्यानिमित्तानं इतिहासाची पानं उलगडता यावीत असं सर्वच कलाकारांना वाटत असतं. अभिनेत्री पल्लवी पाटीलची ही इच्छा 'गोंद्या आला रे' या वेबसिरीजनं पूर्ण केली आहे.

'गोंद्या'साठी पल्लवी बनली दुर्गाबाई चापेकर
SHARES

आपल्यालाही एखादी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळावी आणि त्यानिमित्तानं इतिहासाची पानं उलगडता यावीत असं सर्वच कलाकारांना वाटत असतं. अभिनेत्री पल्लवी पाटीलची ही इच्छा 'गोंद्या आला रे' या वेबसिरीजनं पूर्ण केली आहे.

आजवर ग्लॅमरस भूमिकांमध्ये दिसणारी पल्लवी पाटील आता एका ऐतिहासिक व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'क्लासमेटस्', 'शेंटीमेंटल', 'सविता दामोदर परांजपे', 'बॉइज-२', 'तू तिथे असावे' या चित्रपटांमध्ये ग्लॅमरस भूमिकेत दिसलेली पल्लवी आता वेबसीरिजच्या दूनियेत पदार्पण करत आहे. १५ ऑगस्टला सुरू होणाऱ्या 'गोंद्या आला रे' या वेबसीरिजमध्ये पल्लवीनं एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्याचं प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

'गोंद्या आला रे' असं म्हणताच अनाहुतपणे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या चापेकर बंधूंची आठवण होते. शालेय जीवनात प्रत्येकानं चापेकर बंधूंवरील एक तरी प्रकरण अभ्यासलं असेल यात शंका नाही. जुलमी डब्ल्यू. सी. रॅण्ड या अधिकाऱ्याची चापेकर बंधूंनी हत्या केली होती. या घटनेवर 'गोंद्या आला रे' ही वेब सिरीज बनवण्यात आली आहे. पल्लवीनं या मालिकेत दामोदर चापेकरांच्या पत्नी दुर्गाबाई चापेकर या धडाडी महिलेची भूमिका साकारत आहे. या वेबसिरीजच्या निमित्तानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा इतिहासात डोकावण्याची संधी मिळणार आहे.

'गोंद्या आला रे'सारख्या इतिहासात अजरामर झालेल्या आरोळीचं शीर्षक असलेल्या सिरीजद्वारे बेसिरीजच्या अनोख्या विश्वात दाखल होण्याबाबत पल्लवी म्हणाली की, सिनेजगतात काम केल्यावर वेबसीरिजच्या दूनियेतही काम करायची इच्छा होतीच ती 'गोंद्या आला रे'मुळं पूर्ण झाली. दिग्दर्शक अंकुर काकतकरनं मला दुर्गाबाईंची भूमिका ऑफर केली. या भूमिकेचा अभ्यास करताना त्यांच्या सशक्त व्यक्तिमत्वाची जाणिव होत गेली. एका सशक्त भूमिकेच्या माध्यमातून वेबसीरिजच्या जगात डेब्यू होत असल्याचा मला आनंद वाटतो. 

या सिरीजमधील विधवा झाल्यावर केशवपन करून लाल साडीचा पदर डोक्यावर घेतलेला दुर्गाबाईंचा एक ब्लॅक एन्ड व्हाइट फोटो आणि स्वत:चा तशाच लूकमधला फोटो नुकताच पल्लवीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी पल्लवीनं आपला अंधारात उभी असलेला नऊवारी साडीतला लूक सोशल मीडियावर टाकला होता. याविषयी ती म्हणाली की, दुर्गाबाईंची दोन रूपं या वेबमालिकेतून दिसतील. पती दामोदर चापेकर असताना त्यांना स्वातंत्र्यलढ्यात मुकपणं पाठिंबा देतानाचं आणि दूसरं त्यांच्या निधनानंतर परिस्थितीनुरूप निर्णय घेतानाचं रूपही या वेबसीरिजमध्ये आहेत.



हेही वाचा -

Movie Review: लैंगिक धडे देत बोलायलाही शिकवणारा 'शफाखाना

तुमच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरला आहेत 'यांचे' आवाज




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा