Advertisement

आरोह, किशोरीचा नेहासोबत वाद

घरामध्ये आरोह वेलणकर वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आला. त्याचा घरातला हा पहिलाच टास्क असून, या टास्कमध्ये त्याचा वाद नेहाशी होणार आहे.

आरोह, किशोरीचा नेहासोबत वाद
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सात बारा हे साप्ताहिक कार्य पार पडणार आहे. हा टास्कचा दुसरा दिवस असून, टीम बी मधील सदस्य शेतकरी आणि टीम ए मधील सदस्य कीटक बनतील. टीम ए नं काबीज केलेल्या शेतजमिनी व्यतिरिक्त उर्वरित जमीन टीम बी ला आजच्या कार्याच्या सुरुवातीला शेती करण्यासाठी मिळणार आहे. या कार्यामध्ये दोन्ही टीम्सनं आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आता बघूया या टास्कमध्ये कोण बाजी मारेल? 

घरामध्ये आरोह वेलणकर वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आला. त्याचा घरातला हा पहिलाच टास्क असून, या टास्कमध्ये त्याचा वाद नेहाशी होणार आहे. किशोरी आणि नेहा आपापल्या टीमच्या मुकादम आहेत. बझर वाजल्यानंतर विरोधी टीमनं लावलेली फुलं मोजून त्यांची संख्या बोर्डवर लिहायची आहे. याच वेळेस नेहाचं म्हणणं आहे की, ज्या फुलांच्या कंड्या तुटल्या आहेत ती फुलं मी नाही मोजणार. कारण इतकी लहान काडी आमची देखील काल मोजली नव्हती. त्यावर आरोह म्हणाला की, काहीच संबंध नाही. नेहा चिडायचं नाही आणि चीटिंग नाही करायची. त्यावर शिवानीचं म्हणाली की, बरोबर आहे संचालिकेचा नियम आहे. 

किशोरींचं म्हणणं आहे की, मी आजून फुलं मोजली नाही, थांब. हीनानंही सांगितलं की, तिला हात लावायला देऊ नका, तू काल करत असताना कोणीच काही बोललं नाही नेहा. या सगळ्या वादावर नेहानं सांगितलं की, मी मोजणारच नाही आणि अप्रूव्ह पण नाही करणार. नेहानं असं म्हटल्यावर आरोहचा पारा चढला आणि तो म्हणाला की, त्याचा संबंधच नाही नेहा. तुझ्यावर काही नाही. नेहाचं म्हणणं होतं की, मी विरुध्द टीमची मुकादम आहे. मी जे ठरवणार ते फाईनल. त्यामुळं वाद वाढतच गेला. हा वाद आता कोणती सीमा गाठतो ते पहायचं आहे.



हेही वाचा  -

टोरंटोमध्येही आकाश होणार गुलाबी

महेश मांजरेकर पुन्हा देणार 'धक्का'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा