Advertisement

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेवरील अफवांवर विश्वास ठेवू नका : डॉ. अमोल कोल्हे

डॉ. अमोल कोल्हे यांनीच काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी मालिकेविषयी होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला चाहत्यांना दिला आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेवरील अफवांवर विश्वास ठेवू नका : डॉ. अमोल कोल्हे
SHARES
Advertisement

स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं वृत काही दिवसांपूर्वीच व्हायरल झालं होतं. त्यावरून अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मालिका नेमकी का बंद केली जात आहे? असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले. मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे

डॉ. अमोल कोल्हे यांनीच काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी मालिकेविषयी होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला चाहत्यांना दिला आहे. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, "स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात गेले काही दिवस कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही.” असं म्हटलं आहे

स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेसंदर्भात अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे अनेक पोस्ट फिरत आहेत. टीका करण्यासाठी सरसावलेल्या तथाकथित बोरुबहाद्दरांनी आणि मळमळ असह्य होऊन गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सोशल मीडिया पंडितांनी मालिका संपूर्ण पहावी आणि मग प्रेक्षक या नात्यानं टिप्पणी करावी. मालिका रोज रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर सुरू आहे याची नोंद घ्यावी, असं ट्वीटरवरील पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.हेही वाचा

सनी देओलचे 'या' वेबसीरिजमधून डिजीटल क्षेत्रात पदार्पण

बॉलिवूडमधल्या 'या' कलाकारांनी केली कॅन्सरवर मात

संबंधित विषय
Advertisement