Advertisement

अभिजीत-शिव-वैशालीची योजना आहे तरी काय?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉसनी घरातील सदस्यांवर एक डाव भुताचा हे साप्ताहिक कार्य सोपवलं आहे. ज्यामध्ये टीम ए - रुपाली, नेहा, हिना आणि माधव तर टीम बी - वैशाली, शिव, वीणा, अभिजीत केळकर आहेत.

अभिजीत-शिव-वैशालीची योजना आहे तरी काय?
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉसनी घरातील सदस्यांवर एक डाव भुताचा हे साप्ताहिक कार्य सोपवलं आहे. ज्यामध्ये टीम ए - रुपाली, नेहा, हिना आणि माधव तर टीम बी - वैशाली, शिव, वीणा, अभिजीत केळकर आहेत. किशोरी शहाणे या कार्याच्या संचालिका आहेत. भूत असलेल्या टीमनं काळे कपडे घालायचे आहेत आणि शिकारी असलेल्या टीमनं पांढरे कपडे. वीणा, अभिजीत आणि शिव सेफमध्ये गेले, तर वैशाली सेफमध्ये न जाऊ शकल्यानं ती कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर पडली.


नियमाचा भंग

अभिजीत, वीणा आणि शिवचं असं म्हणणं होतं की, नेहा आणि हिनाला काही करून कॅप्टन नाही होऊ द्यायचं.  त्यामुळं पुढे काय होणार? ते पहायचं आहे. टीम बीमधील कोणता सदस्य कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर जाणार? कोण जिंकणार? काय काय खलबतं रचली जाणार? टीम ए च्या बाहुल्या कुठे कुठे लपवल्या जाणार? हे पुढं पहायला मिळणार आहे. दर आठवड्याला दिल्या जाणाऱ्या टास्क दरम्यान घरातील कोणत्या ना कोणत्या नियमाचा भंग होत आल्यानं एक डाव भुताचा हा टास्क याला अपवाद ठरतो का? ते देखील पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे.


दोन संघांमधील रायव्हलरी

आता अभिजीत, वैशाली आणि शिव यांच्यामध्ये टीम ए च्या बाहुल्या कुठे कुठे लपवता येऊ शकतील याबद्दल गहन चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये अभिजीतचं म्हणणं आहे की, मी कालच विचार करून ठेवला आहे त्यांच्या बाहुल्या आपण कुठे कुठे लपवू शकतो.  अभिजीतनं हेच शिव आणि वैशालीला सांगितलं. कॅमेराच्या वरती, तुळशीच्या खाली खड्डा आहे तिथे लपवू शकतो. आता बघूया यांनी लपवलेल्या बाहुल्या टीम ए शोधू शकते का? या आठवड्यातील दोन संघांमधील ही रायव्हलरी पाहण्याजोगी ठरणार आहे. भुताच्या या डावात कोणाची टीम विजयी होते हे पाहण्यासोबतच कोणाची टरकते हे देखील पहावं लाग्णार आहे.


माझं झालं काम

अशातच माधव किशोरी आणि नेहाबरोबर चर्चा करत आहे कि, अभिजीतनं मला विचारलं तुझ्याकडं दोन पांढऱ्या पॅन्ट आहेत का? माझ्याकडं एक ट्राऊसर आहे, पण मी ती नाही देणार. अजून एक आहे जी मी घातली आहे, पण ती खराब झाली आहे. त्यावर अभिजीत म्हणाला की, माझी इतकी धावपळ नाही आहे. त्यावर माधव म्हणाला की, माझी तरी कुठे होती धावपळ काल, पण झालीच ना खराब. माधव म्हणाला खराब नाही होणार असं म्हणाला, पण झाली तर मी धुवून देईन असं नाही म्हणाला. ते म्हणाला असता तर मी दिली असती. त्यावर अभिजीत म्हणाला की, माझं झालं काम आणि गेला. 


 पँट प्रकरण

माधवचं म्हणणं होतं की, विचारलं तर सांगना मी धुवून देतो, मी टी शर्ट देखील दिलं असतं. माधव पुढे म्हणाला की, जर तुला एखाद्या गोष्टीची गरज आहे, तर ती कशी मागितली पाहिजे, त्याला हे कळत कि भाकरी बनविण्यासाठी तेल मागण्याची पद्धत नीट पाहिजे. एखाद्याला विनंती करताना ते कसं बोललो पाहिजे हे पण कळायला हवं ना? त्यावर किशोरी म्हणाल्या की, प्लीज आपण म्हणूच शकतो. आता हे पँट प्रकरण माधव आणखी कुणाकुणाला सांगतो ते पाहू.हेही वाचा  -

हिमेश बनला हॅप्पी आणि हार्डी

सात वर्षांनी एकत्र येणाऱ्या उमेश-प्रियाला 'आणि काय हवं'
संबंधित विषय
Advertisement