Advertisement

छोट्या पडद्यावर येतंय 'एक घर मंतरलेलं'

'तुमचं घर आहे ना सुरक्षित?' असा काहीसा गूढ प्रश्न विचारत छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक नवी रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं शीर्षक आहे 'एक घर मंतरलेलं'.

छोट्या पडद्यावर येतंय 'एक घर मंतरलेलं'
SHARES

'तुमचं घर आहे ना सुरक्षित?' असा काहीसा गूढ प्रश्न विचारत छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक नवी रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं शीर्षक आहे 'एक घर मंतरलेलं'.


मंतरलेल्या घराची गोष्ट 

शीर्षकावरूनच या मालिकेत गूढ कथानक असणार याची खात्री पटते. घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असंही एक घर असतं जे तुम्हालाचं ओढून घेतं... अशाच मंतरलेल्या घराची गोष्ट झी युवा या वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या 'एक घर मंतरलेलं' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. काहीतरी अनपेक्षित असंभवनीय, गूढ आणि रहस्यमय असलेल्या या घरात ४ मार्चला गृहप्रवेश म्हणजे मालिकेचा शुभारंभ होणार आहे. आजवर नेहमीच युथ स्पेशल मालिकांवर फोकस करणाऱ्या झी युवाची सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी असलेली ही आणखी एक नवी मालिका आहे.


रात्रीस खेळ चाले

या मालिकेत नेमकं कशा प्रकारचं कथानक पाहायला मिळणार आहे, कोणकोणते कलाकार आहेत याबाबत काहीही अधिकृत माहिती वाहिनीच्या वतीनं देण्यात आलेली नाही. झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'रात्रीस खेळ चाले' या रहस्यमय मालिकेचं दुसरं पर्व सध्या जोरात सुरू आहे. 'एक घर मंतरलेलं'च्या माध्यमातून झी युवानेही अशाच प्रकारची मालिका सुरू करत झी ग्रुपच्याच दोन्ही वाहिन्यांवर प्रेक्षक रमतील याची काळजी घेतल्याचं जाणवतं. झी युवाचं हे पाऊल प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस उतरतं ते मालिका सुरू झाल्यावरच समजेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा