मध्य प्रदेशातील कलाकारांचा मुंबईत अनोखा आविष्कार


  • मध्य प्रदेशातील कलाकारांचा मुंबईत अनोखा आविष्कार
  • मध्य प्रदेशातील कलाकारांचा मुंबईत अनोखा आविष्कार
  • मध्य प्रदेशातील कलाकारांचा मुंबईत अनोखा आविष्कार
SHARE

दसऱ्यानंतर आता दिवाळी सणासाठी ग्राहकांची लगबग सुरू होणार आहे. या निमित्ताने मध्य प्रदेशातील कलाकारांनी साकारलेल्या हातमागावरील कलाकृती आणि हस्तकलेचे प्रदर्शन शिवाजी पार्कच्या महापौर बंगल्यासमोरच्या महाराष्ट्र स्टेट स्काऊट्स अॅण्ड गाईड्सच्या हॉलमध्ये भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन ३० सप्टेंबरपर्यंत सुरु राहाणार आहे.मध्यप्रदेश सरकारच्या अखत्यारीत असलेल्या संत रविदास एम. पी. हस्तकला विकास निगम लि. च्या ‘मृगनयनी’ या विभागातर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात मध्यप्रदेशातील विविध भागांतील अनेक कलाकारांचा समावेश होता.मध्यप्रदेशातील नामवंत आणि होतकरू कलाकारांनी साकारलेल्या वेगवेगळ्या हस्तकला, शिल्पे आणि चित्रे तसेच हातमागावरील कलाकृती यांचा या प्रदर्शनात समावेश होता. त्यात चंदेरी, माहेश्वरी, मलबेरी, तुसार, सिल्क साड्या आणि ड्रेस मटेरियल्स, रेडिमेड गारमेंट, बेड कवर, बेल मेटल, गोंद पेंटिंग, गोल्ड ठेवा ज्वेलरी अशा अनेक आकर्षक कलाकृतींचा समावेश होता. मध्यप्रदेशात प्रसिद्ध असलेल्या सर्व कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.‘मृगनयनी’ हा विभाग मध्यप्रदेश सरकारच्या अखत्यारीत असलेल्या संत रविदास एम. पी. हस्तकला विकास निगम लि. संस्थेच्या अंतर्गत कार्यरत आहे. कलाकृतींचे भारतात विविध ठिकाणी प्रदर्शन भरवून त्याद्वारे त्यांना रोजगार प्राप्त करून देणे, हा या विभागाचा प्रमुख उद्देश असून ते गेली अनेक वर्ष हा उपक्रम राबवत आहेत. या संस्थेने आतापर्यंत भारतातील अनेक शहरांमधून प्रसिद्ध आणि गुणवान कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतींची भव्य प्रदर्शने भरवली असून अनेक कलाकारांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.हेही वाचा - 

शाओमी घेऊन येत आहे दिवाळी सेल


संबंधित विषय
ताज्या बातम्या