शाओमी घेऊन येत आहे दिवाळी सेल


शाओमी घेऊन येत आहे दिवाळी सेल
SHARES

सणासुदीचा काळ सुरू झाल्यानंतर ग्राहकांची खरेदीसाठी धावपळ सुरू होते. अशा वेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉल, दुकानांत आणि ऑनलाईन खरेदीवर सूट दिली जाते. त्यामुळेच फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने 21 ते 24 सप्टेंबरपर्यंत ग्राहकांसाठी धमाकेदार सेल सुरू ठेवला होता. आता टीनी मोबाईल निर्माता कंपनी शाओमी दिवाळीनिमित्ताने ग्राहकांसाठी सेल घेऊन येत आहे. यामध्ये ग्राहकांना मोबाईलपासून ते इतर वस्तूंच्या खरेदीवर भरघोस सूट मिळणार आहे.

हा सेल 27 सप्टेंबरपासून ते 29 सप्टेंबरपर्यंत सुरू राहिल. त्यासाठी तुम्हाला mi.com या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.


फ्लॅश सेल

यादरम्यान शाओमीचा एक फ्लॅश सेल देखील असेल. यामध्ये तुम्ही फक्त 1 रुपयात शाओमीचा फोन खरेदी करू शकता. या सेलची सुरुवात सकाळी 10 वाजता सुरू होईल.


रेडमी नोट 4 वर डिस्काऊंट

  • सेलच्या दरम्यान रेडमी नोट 4 च्या 3GB+32GB या वर्जनवर 1,000 रु. आणि 4GB+64GB वर्जनवर 2,000 चा डिस्काऊंट मिळेल
  • रेडमी 4 च्या 3GB रॅम आणि 32GB मेमरी असलेल्या फोनवर 500 रुपयांची सूट मिळेल. पॉप्युलर पावरबँकवरही तुम्हाला भरघोस सूट मिळेल. 2,199 रु. चा पावरबँक सेलच्या दरम्यान 1,799 रुपयाला मिळेल.
संबंधित विषय