गरजू मुलांच्या उपचारासाठी मिळणार निधी

 BMC office building
गरजू मुलांच्या उपचारासाठी मिळणार निधी
गरजू मुलांच्या उपचारासाठी मिळणार निधी
गरजू मुलांच्या उपचारासाठी मिळणार निधी
See all

परळ - गरजू मुलांच्या उपचारासाठी निधी उभारण्याच्या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची सांगता परळच्या आयटीसी ग्रँड मराठामध्ये शनिवारी झाली. सिंग फॉर जीएफ किड्स जेनेसीस या संस्थेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. या पर्वात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू या शहरातील विविध व्यावसायिक सहभागी झाले होते. त्यांच्या गटात गायनाची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला निधी समाजातील दुर्बल आणि गरजू आजारी मुलांच्या उपरासाठी वापरण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रसिद्ध सूत्रसंचलक आणि गायक मिहिर जोशी यांनी केलं. तर परिक्षक म्हणून भारतीय सुफी आणि शास्त्रीय गायक झुला खान, भारतीय आणि पाश्चिमात्य फ्युजन गायक लेसली लुईस आणि म्युझिक कंपोझर म्हणून ओळख असणाऱ्या आशिष मनचंदा हे उपस्थित होते. तसंच या वेळी हर्षदीप कौर यांच्या गायनाची विशेष झलकही अनुभवायला मिळाली. कार्यक्रमाअंती या प्रमुख परिक्षकांनी आपल्या गाण्यांनी कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली.

तर दिल्लीच्या दिल से या टीमनं प्रथम पारितोषिक मिळवलं. तर मुंबईने दुसरे पारितोषिक आणि बंगळुरू तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. या सोहळ्याला अभिनेत्री दिया मिर्झाची विशेष उपस्थिती होती. आपल्यामुळे समाजातील निरागस मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आयुष्यावर मात करण्याचं बळ मिळणाऱ्या उपक्रमाचा भाग होणं म्हणजे एक अव्दितीय क्षण असल्याचं असं दिया म्हणाली. तर स्पर्धेतल्या विजयी गटाला मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आलं. या वेळी जेनेसिस फाउंडेशनचे संस्थापक प्रेमा सागरही उपस्थित होत्या.

Loading Comments