गणेश गल्ली गणेश उत्सव मंडळाचा गौरव

 Mumbai
गणेश गल्ली गणेश उत्सव मंडळाचा गौरव
गणेश गल्ली गणेश उत्सव मंडळाचा गौरव
See all

लालबाग - मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लालबाग गणेश गल्ली गणेशोत्सव सार्वजनिक मंडळाला 2016चा सर्वात सुरक्षित गणेश मंडप म्हणून गौरवण्यात आलंय. गणेशोत्सवा दरम्यान मुंबईतल्या 200 मंडळांनी वेळे आधीच सुरक्षात्मक उपाययोजना हाती घेतली होती. यात लालबाग गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सर्वात सुरक्षित गणेश मंडप म्हणून गौरवण्यात आलंय. फायर अॅण्ड सिक्युरिटी ऑफ इंडिया तर्फे त्यांता गौरव करण्यात आला. सलग सहाव्यांदा मंडळानं हा पुरस्कार मिळवलाय. गणेश गल्ली मंडळानं सीसीटीव्ही कॅमेरे आणि संपूर्ण परिसरात सुरक्षा रक्षक व्यवस्था ठेवली होती. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीसही तैनात होते, असं मंडळाचे सेक्रेटरी स्वप्नील परब यांनी सांगितलं.

Loading Comments