विषमुक्त शेती प्रशिक्षण कार्यशाळा

 wadala
विषमुक्त शेती प्रशिक्षण कार्यशाळा

'विषमुक्त शेती' अशा आगळ्या-वेगळ्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन 3 जून रोजी वडाळा येथली रामभाऊ म्हाळगी या सभागृहात करण्यात आले होते. समरसेट फाऊंडेशनतर्फे ही प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. दरवेळी विविध लोकोपयोगी विषयांप्रमाणे यावेळीही आंबा, काजू, चिकू यांसारख्या झाडांची लागवड, त्यांचे खत-पाणी इत्यादी गोष्टींसह लागवडीसाठी लागणारा कालावधी, जमीन, वातावरण, माती परिक्षण, रासायनिक खत कसे आणि किती प्रमाणत वापरावे? याचे संपूर्ण मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. 

यावेळी प्रमुख वक्ता म्हणून विनायक काशीद (डायरेक्टर - युनिक ऍग्री सोल्युशन प्रा.लि.) यांनी या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे आहे त्या जमिनीत विविध पिके कशी पिकवावीत? कुठल्याही रासायनिक खताचा उपयोग न करता विषमुक्त शेती कशी करावी? यावर प्रामुख्याने या कार्यशाळेत भर देण्यात आला.

Loading Comments