Advertisement

महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान


महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान
SHARES

घाटकोपर - जागतिक महिला दिनानिमित्ताने घाटकोपर मधील पोलिसा़ंनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.

घाटकोपर पोलीस ठाण्यात सकाळी 11 वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांच्या हस्ते गुलाबाचे पुष्प देण्यात आले. 

पुरुषांच्या बरोबरीने पोलीस खात्यात काम करणाऱ्या महिलांचा आदर आपण सर्वांनीच करणे गरजेचे आहे. आपल्या आयुष्यात महिलांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे असं यावेळी व्यंकट पाटील म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement