क्रांतीज्योती सावित्रीबाईंना 'गुगल'चं अभिवादन

 Pali Hill
क्रांतीज्योती सावित्रीबाईंना 'गुगल'चं अभिवादन

मुंबई - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज 186वी जयंती. या जयंतीनिमित्तानं सावित्रीबाईंच्या कार्यासमोर सारेच नतमस्तक होत असताना ‘गुगल’नंही डुडलच्या माध्यमातून सावित्रीबाईंना अभिवादन केलं आहे.

सातारा जिल्ह्यातील नायगावला 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला होता. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणं गरजेचं आहे हे ओळखूनच त्यांनी तत्कालीन समाजाच्या रुढी-परंपरांना तडा दिला आणि महिलांच्या शिक्षणाची सुरुवात केली. जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंनीही मोलाची भूमिका बजावली होती.

Loading Comments