Advertisement

छोट्या पडद्यावर अवतरणार दत्तगुरू

हरे चिंता, करी भयमुक्त 'श्री गुरुदेव दत्त' असं म्हणत छोट्या पडद्यावर दत्तगुरू अवतरणार आहेत. श्री दत्तगुरुंचा महिमा सांगणारी 'श्री गुरुदेव दत्त' ही पौराणिक मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे.

छोट्या पडद्यावर अवतरणार दत्तगुरू
SHARES

हरे चिंता, करी भयमुक्त 'श्री गुरुदेव दत्त' असं म्हणत छोट्या पडद्यावर दत्तगुरू अवतरणार आहेत. श्री दत्तगुरुंचा महिमा सांगणारी 'श्री गुरुदेव दत्त' ही पौराणिक मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे.


जुन्या मालिकांना नवसंजीवनी

मराठी चित्रपटसृष्टीत प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून नाव कमावणारा सतिश राजवाडे स्टार प्रवाह वाहिनीचा कार्यक्रम प्रमुख बनल्यापासून वाहिनीवरील मालिकांचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. जुन्या मालिकांना नवसंजीवनी देत सतिशनं आजवर कधीही प्रेक्षकांच्या भेटीला न आलेले विषय मालिकांच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर मांडण्याचं धाडस दाखवलं आहे. यात 'डॅा. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेपाठोपाठ आता दत्तगुरूंची महती वर्णन करणारी 'श्री गुरुदेव दत्त' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


१७ जूनपासून सुरू 

१७ जूनपासून सुरू होणाऱ्या या नवीन मालिकेत दत्तगुरुंचा जन्म, बालपणीच्या त्यांच्या अगाध लीला आणि माता अनसूयासोबतचं त्यांचं नातं उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे. श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसंच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. याच कारणामुळं 'त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त' असं पुराणांमध्ये दत्तगुरुंचं वर्णन केलं आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केलं गेलं आहे. 


अद्भुत कथा

दत्तगुरूंच्या अवताराची गोष्ट मालिकेत पाहायला मिळणं हा प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव ठरेल असं मत सतीशनं व्यक्त केलं आहे. तो म्हणाला की, इतक्या महान अवताराची कथा सांगताना गर्व, अभिमान आणि आनंद वाटत अगश्. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा मिळून एक अवतार जन्मला ते म्हणजे दत्तगुरू. दत्तगुयरूंच्या अवताराची जन्मापासूनची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळेल. अत्री ऋषी आणि माता अनसूयेच्या पोटी जन्माला येण्यापासून ते अगदी आजही त्यांच्या महात्म्याची वेळोवेळी प्रचिती देणारी अद्भुत कथा सादर करण्याचा स्टार प्रवाहचा प्रयत्न असेल. अध्यात्म, सत्य आणि अप्रतिम व्हिज्युअल इफेक्टस याची उत्तम सांगड या मालिकेत दिसेल.


भव्यदिव्य सेट

अभिनेते-दिग्दर्शक दिपक देऊळकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून, देऊळकर स्वत: अनिल राऊत यांच्यासोबत या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. लेखन स्वामी बाळ यांनी केलं आहे. पौराणिक काळ जिवंत करणारा भव्यदिव्य सेट या मालिकेचं एक वैशिष्टय ठरणार आहे. या मालिकेतील कलाकारांच्या नावांची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.



हेही वाचा  -

रुपेरी पडद्यावर झळकणार छत्रपतींचे 'सरसेनापती हंबीरराव'

बिचुकलेंना शिवानी देणार घरकामाचे धडे!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा