Advertisement

'बिग बॉस'मध्ये कोण कोणावर करणार 'हल्ला बोल'?

बिग बॉस मराठीमधून वैशाली माडे घराबाहेर पडल्यानं अभिजीत, शिव, विणा यांना वाईट वाटलं आहे, पण हे सर्व दु:ख विसरून घरातील सदस्य कॅप्टन्सीच्या लढतीत सहभागी होताना दिसणार आहेत.

'बिग बॉस'मध्ये कोण कोणावर करणार 'हल्ला बोल'?
SHARES

बिग बॉस मराठीमधून वैशाली माडे घराबाहेर पडल्यानं अभिजीत, शिव, विणा यांना वाईट वाटलं आहे, पण हे सर्व दु:ख विसरून घरातील सदस्य कॅप्टन्सीच्या लढतीत सहभागी होताना दिसणार आहेत. आता घरामध्ये 'हल्ला बोल' हे कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. हे कार्य अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वेमध्ये रंगणार आहे. आता या आठवड्यामध्ये शिवानी कि अभिजीत कोणाला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन होण्याचा मान मिळणार हे पहायचं आहे.


शिवानीचा शिवला सल्ला

आता विणा आणि शिवच्या नात्याबद्दल शिवानी आणि शिवमध्ये चर्चा रंगणार आहे. त्यामध्ये शिवानी शिवला सल्लाही देताना दिसणार आहे. शिवानीचं म्हणणं आहे की, तुझा टॅटू खूपच छान आहे, घराबाहेर गेल्यावर मी देखील अजिंक्यच्या नावाचा टॅटू करणार आहे. शिवचं म्हणणं आहे की, टॅटू म्हणजे खूप मोठी गोष्ट असते ना? शिवानीनं सांगितलं की, अजिंक्यनं माझ्या नावाचा टॅटू केला आहे. शिवचं म्हणणं आहे की, खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्यभर आपल्या शरीरावर राहणार, टॅटूला बघितल्यावर राग नाही आला पाहिजे. 


शिवानीला धक्का बसला 

शिवानीनं त्याला विचारलं आता दोघांकडूनही सारखी भावना असल्याचं समजू शकते. आता बाहेर जाईपर्यंत आणि गेल्यावरही असंच राहू दे. त्यावर शिव म्हणाला की, बघू... तर शिवानीला जरा धक्का बसला आणि त्यावर ती म्हणाली की, बघू? तिच्या आश्चर्यचकित झालेल्या चेहऱ्याकडं पाहून शिवनं तिची समजूत काढण्याच्या सूरात सांगितलं की, अगं बघू म्हणजे माझीदेखील तीच इच्छा आहे, पण आपण कोणावर जबरदस्ती नाही ना करू शकत. मी इथे जसा दिसत आहे तसा शंभर टक्के खरा आहे आणि ती देखील खरीच आहे. त्यामुळं बाहेर जाऊन देखील असंच राहिल नाही बदलणार.


हेही वाचा  -

१५ आॅगस्टच्या रेसमधून 'साहो' बाहेर

Exckusive : चार भाषांमध्ये रिमेकची 'टकाटक' आॅफर!
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा