Advertisement

खादीचा वारसा जपणारा हँडलूम फेस्टिव्हल दादरमध्ये रंगणार


खादीचा वारसा जपणारा हँडलूम फेस्टिव्हल दादरमध्ये रंगणार
SHARES

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला सत्य अाणि अहिंसा या मूल्यांची देणगी देतानाच त्यांनी देशवासीयांना खादीचे महत्त्व समजावून सांगितले. सध्या खादीला देशवासीयांची चांगली पसंती मिळत असून प्रजासत्ताक दिन ते महात्मा गांधी पुण्यतिथी असे पाच दिवस हँडलूम फेस्टिव्हल साजरा करण्यात येणार अाहे. दादरमधील रानडे रोडवरील उज्ज्वल तारा हँडलूम स्टुडियोत हा महोत्सव २६ ते ३० जानेवारीदरम्यान सकाळी १० ते रात्री ८.३० पर्यंत रंगणार अाहे.


खादी पेहरावाची पर्वणी

या फेस्टिव्हलमध्ये हातमागावर तयार केलेल्या विविधरंगी कलाकृतींच्या साड्या अर्थात कॉटन, खादी, सिल्क, लिनन, मोकलिनच्या साड्या, महेश्वरी साड्या, बनारसी सिल्क, चंदेरी साड्या तसंच अोढण्यांमध्ये खादी, रेशीम, मलमल, जयपूर ब्लॉक प्रिंट अाणि भरतकाम केलेल्या पर्सेस, अनेक प्रकारांतील पारंपरिक आकर्षक वस्तू पाहायला मिळतील. या महोत्सवाची खासियत म्हणजे, नैसर्गिक रंगापासून हे हातमागावरील कापड तयार केलं जाते. आपण नेहमी जे कपडे घालतो त्यापेक्षा जरा वेगळा लूक देणारं कपडे बघायचे असतील तर या फेस्टिव्हलला नक्की भेट द्या.



हँडलूम फेस्टिव्हलच्या निमित्तानं प्रजासत्ताक दिन साजरा करणं अाणि राष्ट्रपिता महात्मा गांधींना अादरांजली वाहणं, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश अाहे.

- उज्ज्वला सामंत, उज्ज्वल ताराच्या संचालिका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा