गोरेगावमध्ये अंगणवाडी महिला कार्यकर्त्यांचा सन्मान


  • गोरेगावमध्ये अंगणवाडी महिला कार्यकर्त्यांचा सन्मान
  • गोरेगावमध्ये अंगणवाडी महिला कार्यकर्त्यांचा सन्मान
  • गोरेगावमध्ये अंगणवाडी महिला कार्यकर्त्यांचा सन्मान
SHARE

गोरेगाव - जागतिक महिला दिनानिमित्त राजस्थान हॉलमध्ये आय. सी. डी. एस गोरेगाव प्रकल्पांतर्गत अंगणवाडी महिला कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री विद्या ठाकूर, नगरसेविका श्रीकला पिल्ले, राजुल देसाई उपस्थित होत्या. 

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांनी 'स्त्री-भ्रूण हत्या' या विषयावर पथनाट्य, कुपोषणावर भारुड सादर करून जनजागृतीचा संदेश दिला. 

तसेच गोरेगाव बिटमध्ये चांगले काम करणाऱ्या सेविका आणि मदतनीस अशा सात ठिकाणच्या सातजणींचा सत्कार यावेळी करण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या