रविवारी भारतीय नौदल धावणार रस्त्यावर

  Bandra East
  रविवारी भारतीय नौदल धावणार रस्त्यावर
  मुंबई  -  

  नेव्हीदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल सेनेतर्फे इंडियन नेव्ही हाफ मॅरथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या हाफ मॅरेथॉनचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. ४ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारतीय नौदल सेनेने यश मिळवले होते. त्या निमित्ताने दरवर्षी हा दिवस नेव्ही दिन म्हणून साजरा केला जातो. येत्या रविवारी १९ नोव्हेंबरला ही मॅरथॉन बीकेसी एमएमआरडी ग्राऊंडवर आयोजित करण्यात आली आहे.


  इतर स्पर्धकांचा देखील सहभाग

  या मॅरथॉनमधून नीरोगी आरोग्य, उस्ताहपूर्ण आरोग्य तसेच राष्ट्रवादी, देशभक्ती असावी असा सेंदेश देण्यात येणार आहे. तसेच या मॅरथॉनमध्ये नेव्हीच्या व्यतिरीक्त इतर स्पर्धक देखील सहभागी होऊ शकतात. या मॅरेथॉनमध्ये एकूण १४ हजार लोक सहभाग होण्याची मर्यादा असून आतापर्यंत १० हजार लोकांनी सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षी यामध्ये फक्त ४५०० लोकांनी सहभाग घेतला होता.


  मॅरेथॉन तीन प्रकारात होतील 

  या हाफ मॅरथॉनमध्ये २१ किमी एअरक्राफ्ट रन, १० किमी डेस्ट्रॉयर रन आणि ५ किमी फ्रिगेट रन अशा तीन प्रकारचे मॅरेथॉन होणार आहे. विशेष म्हणजे यातील विजयी स्पर्धकांना नेव्हीची आठवण रहावी असे वेगळे पारितोषिक दिले जाणार आहे. त्यात आकर्षक लाकडी शिप असलेली प्रतिकृती असणार आहे.


  दिव्यांग मुले सादर करतील बँड पथक

  पहिली १० किमी रन ही सकाळी ५.३० ला चालू होणार आहे. तर २१ किमी ही ५.५५ ला चालू होणार आहे. या मॅरथॉनमध्ये नेव्ही आणि त्यांच्या कुटुंबातले एकूण २ हजार लोक सहभागी झाले आहेत. या मॅरथॉनमध्ये सुरुवातीला सायकलिस्ट सहभागी होती जे स्पर्धकांना मार्ग दाखवत त्यांना लीड करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या मॅरथॉनमध्ये नेव्ही बॅंड सोबत धारावी येथील दिव्यांग मुलांचे बॅंड पथक आपली कला सादर करणार आहेत.  हेही वाचा - 

  मुंबईकरांनी रविवारीही दाखवली अल्ट्रा एनर्जी, अल्ट्रा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.