पोलीस स्टेशनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

 Rafi Ahmed Kidwai Marg
पोलीस स्टेशनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
पोलीस स्टेशनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
See all

वडाळा - भारताचा 68 वा प्रजासत्ताक दिन देशभर सर्वत्रच साजरा केला गेला. देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर जवानांना आपण कसे विसरू शकतो? वडाळा येथील रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त निवृत्त आर्मी जवान फ्लेक्चर पटेल यांनी हजेरी लावली होती. ध्वजारोहण करून फ्लेक्चर यांनी शाळकरी मुलांना तसेच तिथे हजर असलेल्या पोलीस कर्मचारी आणि जनतेपुढे भारत देशाविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले.

Loading Comments