रहेजा महाविद्यालयात 'कल्पोत्सव'ची धूम

वरळी - सालाबादाप्रमाणे यंदाही वरळीच्या एल. एस. रहेजा महाविद्यालयात कल्पोत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं. या वेळी फोटोग्राफी, कॅलिग्राफी, फाईन आर्टच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला या प्रदर्शनातून मांडल्या. या प्रदर्शनाला अनेक कंपन्याही भेट देतात. तेव्हा या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावही मिळतो आणि व्यावसायिक संधीही उपलब्ध होते. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 


Loading Comments