घाटकोपरमध्ये रंगला बाल महोत्सव

 Ghatkopar
घाटकोपरमध्ये रंगला बाल महोत्सव
घाटकोपरमध्ये रंगला बाल महोत्सव
घाटकोपरमध्ये रंगला बाल महोत्सव
घाटकोपरमध्ये रंगला बाल महोत्सव
घाटकोपरमध्ये रंगला बाल महोत्सव
See all

घाटकोपर - लोकसेवा सहकारी संस्थेच्या (मर्यादित) वतीनं बाल महोत्सव आयोजित करण्यात आला होता. हा महोत्सव घाटकोपर पश्चिम येथील नूतन भीमज्योत क्रीडा मंडळाच्या मैदानात झाला.

नाताळनिमित्तानं खास बच्चे कंपनीसाठी हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. या कार्यक्रमात बच्चे कंपनीचे आवडते छोटा भीम आणि डोरेमॉनही उपस्थित होते. यात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ट्रेन सर्कल, जम्पिंग-जपांग आणि छोटा आकाशपाळणाही होता.

बच्चे कंपनीला या खेळांसोबत कँडिफ्लॉस आणि पॉपकॉर्न असा खाऊसुद्धा ठेवण्यात आला होता. ‘लहान मुलांच्या निरागस चेहऱ्यावरचं हसण्यासारखी जगात दुसरी आनंदाची गोष्टच नाही. या बाल महोत्सवात बच्चे कंपनी आनंदाने बागडताना दिसल्यानं बरं वाटलं,' असं लोकसेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष शरद भावे यांनी सांगितलं.

Loading Comments