प्राचीन चित्रकलेचा वारसा सांगणारी व्याख्यानमाला

  Sion
  प्राचीन चित्रकलेचा वारसा सांगणारी व्याख्यानमाला
  मुंबई  -  

  डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात शनिवारी संध्याकाळी 'दी लाँग एक्स्पोजर पेंटिंग अँड फोटोग्राफी इन अर्ली ट्वेंटीथ सेंच्युरी, मैसूर' या विषयावरील व्याख्यान पार पडले. शुक्ला सावंत या व्याख्यानाच्या प्रमुख वक्त्या होत्या. शुक्ला सावंत या व्हिज्युअल आर्टिस्ट आणि सध्या कला-सौंदर्यशास्त्र तसेच नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात व्हिज्युअल स्टडीजच्या प्राध्यापिका आहेत. 

  विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील वेंकटप्पा, केशव, सुब्रह्मण्यम राजू आणि हनुमिया यांच्या चित्रकलेच्या माध्यमातून मैसुरमधील लँडस्केप पेंटिंगच्या वेगवेगळ्या पद्धती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या वेळी या व्याख्यानात मांडण्यात आले. त्याचसोबत चित्रकला आणि फोटोग्राफी याच्या सुरुवातीच्या काळाविषयी चर्चा या व्यख्यानात रंगल्या. डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी अशा वेगवगेळ्या विषयांवरील व्याख्यान घेण्यात येते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.