वझे कॉलेजमध्ये विद्यार्थीनींना कायद्याचे धडे

 Mulund
वझे कॉलेजमध्ये विद्यार्थीनींना कायद्याचे धडे
वझे कॉलेजमध्ये विद्यार्थीनींना कायद्याचे धडे
See all

मुलुंड - तरुण पिढीला आणि खास करून मुलींना कायद्याचं ज्ञान मिळालंच पाहिजे. यासाठीच मुलुंडमधल्या वझे कॉलेजात एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेले पाच दिवस होणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोह मंगळवारी झाला. मुलींना त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्याचं संपूर्ण ज्ञान या कार्यक्रमात देण्यात आले. 

हुंडा विरोधी कायदा, घरगुती हिंसाचार कायदा तसेच स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचार विरोधी कायद्यांसंदर्भात विद्यार्थीनींना माहिती देण्यात आली. कायदे तज्ज्ञ मातंगी अय्यर आणि डॉ. शांता यांनी या विद्यार्थीनींना कायद्या संदर्भात माहिती दिली.

Loading Comments