Advertisement

नव्या घरात रंगणार 'मराठी बिग बॅास'चा खेळ

'मराठी बिग बॅास'चं पहिलं पर्व यशस्वी झाल्यानं सर्वांनाच दुसऱ्या पर्वाचे वेध लागले आहेत. दुसऱ्या पर्वात महेश मांजरेकर एका नव्या रूपात भेटणार असून, नव्या घरात ते 'मराठी बिग बॅास'चा खेळ खेळणार आहेत.

नव्या घरात रंगणार 'मराठी बिग बॅास'चा खेळ
SHARES

'मराठी बिग बॅास'चं पहिलं पर्व यशस्वी झाल्यानं सर्वांनाच दुसऱ्या पर्वाचे वेध लागले आहेत. दुसऱ्या पर्वात महेश मांजरेकर एका नव्या रूपात भेटणार असून, नव्या घरात ते 'मराठी बिग बॅास'चा खेळ खेळणार आहेत.


दुसऱ्या पर्वाची घोषणा

'मराठी बिग बॅास'च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महेश मांजरेकरांनी आपल्या परफॅार्मंसद्वारे रंग भरला. 'मराठी बिग बॅास २'च्या गाण्यावर ठेका धरत मांजरेकरांनी आपल्या शैलीत नृत्य केलं. या सोहळ्याला मांजरेकरांसोबत वायाकॅाम १८ मराठी मनोरंजनचे व्यवसाय प्रमुख निखिल साने, एंडेमॅाल शाइन इंडियाचे सीईओ अभिषेक रेगेही उपस्थित होते. पहिल्या पर्वाची स्पर्धक शर्मिष्ठा राऊतनं या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं.


घराबाबत उत्कंठा

मागील काही दिवसांपासून 'मराठी बिग बॅास २'चे विविध प्रोमोज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. यात मांजरेकर वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांना दिसत असल्यानं 'मराठी बिग बॅास'च्या घरात यंदा कोणकोणते सेलिब्रिटी दिसणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. मांजरेकरांनीही ही उत्सुकता अधिक ताणत स्पर्धकांची नावं गुलदस्त्यातच ठेवली. 'मराठी बिग बॅास'च्या दुसऱ्या पर्वाचा खेळ दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीमध्ये रंगणार आहे. मांजरेकरांनीही अद्याप हे घर पाहिलं नसल्यानं प्रेक्षकांइतकीच आपल्यालाही या घराबाबत उत्कंठा असल्याचं ते म्हणाले.


मुखवटे उतरून जातात 

'मराठी बिग बॅास'च्या दुसऱ्या सिझनचं सूत्रसंचालन करणारे मांजरेकर म्हणाले की, 'मराठी बिग बॅास' हा मराठी टेलिव्हीजन विश्वातील सगळ्यात महत्वाचा शो असल्याचं मला वाटतं. कारण या कार्यक्रमामुळं आपल्याला माणसं खऱ्या आयुष्यात कशी आहेत ते बघायला मिळतं. घरामध्ये घडणाऱ्या घटनांमुळं चेहऱ्यावर असलेले मुखवटे काही क्षणांतच पूर्णपणे उतरून जातात आणि यामुळेच हा शो प्रेक्षकांना खरा वाटतो. पहिल्या सिझन प्रमाणे हा सिझन देखील त्यांच्या पसंतीस उतरेल याची खात्री आहे.


१५ जणांचा समावेश

दुसऱ्या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील १५ व्यक्ती 'मराठी बिग बॅास'च्या घराचे सदस्य बनणार आहेत. याव्यतिरिक्त बिग बॉसचं घर प्रेक्षकांसाठी सर्वात मोठं सरप्राईज ठरणार आहे. हे घर तब्बल १४,००० चौरस फूट अशा भव्य जागेमध्ये तयार करण्यात आलं आहे. या घराला आलिशान अस्सल मराठमोळ्या वाड्याचं स्वरूप देण्यात आलं आहे. याच्या मध्यभागी मोठं आंगण आणि मोठं ऍक्टिव्हिटी क्षेत्र असणार आहे. याव्यतिरिक्त, एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील. 


घराला वाड्याचं स्वरूप

याबाबत निखल साने म्हणाले की, मला असं वाटतं बिग बॉस हा रिअॅलिटी शो स्पर्धकांमधील भावना खऱ्या अर्थानं प्रेक्षकांपर्यंत पोहचवू शकतो. या कार्यक्रमाचं हेच वैशिष्ट्य आहे, जे बाहेरच्या जगातील वास्तविकतेशी साधर्म्य दाखवतं. पहिल्या पर्वापेक्षा दुसरं पर्व अधिक रंजक व्हावं याकरीता आम्ही कार्यक्रमामध्ये काही बदल केले आहेत. जसे कठोर नियम, आव्हानात्मक टास्क. या पर्वातील सगळ्यात मोठं आकर्षण असणार आहे 'बिग बॉसचं घर'. ज्याला अस्सल मराठमोळ्या वाड्याचं स्वरूप देण्यात आलं आहे.हेही वाचा  -

'मोगरा'साठी आनंद बनला बँक मॅनेजर

'टकाटक' जोडीचा गंमतीशीर ट्रेलर
संबंधित विषय
Advertisement