विलास शिंदे यांच्या आईचे निधन

 Pali Hill
विलास शिंदे यांच्या आईचे निधन

मुंबई - वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या आईचा मृत्यू झाला. विलास शिंदे यांच्या तेराव्याची आज पूजा होती. पूजा झाल्यानंतर त्यांची आई कलावती विठोबा शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. वांद्रे इथे ड्यूटीवर असेलल्या विलास शिंदे यांना बाईकस्वारांनी मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिंदेंचा 31 ऑगस्ट रोजी लिलावती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आधीच घरचा कर्ता पुरुष गमावलेल्या शिंदे कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Loading Comments