जागतिक महिला दिनानिमित्त वृक्षारोपणाचे आयोजन

 Mumbai
जागतिक महिला दिनानिमित्त वृक्षारोपणाचे आयोजन

विलेपार्ले - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन विलेपार्ले पूर्व येथे वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया येथील नवीन एअरपोर्ट कॉलनी याठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला. 

या वृक्षारोपण कार्यक्रमाला एमएमआरसीच्या मॅनेजिंग डायरेक्टर अश्विनी भिडे तसेच एएआयच्या प्रमुख कार्यकारी संचालक के. हेमलता या वेळी उपस्थित होत्या. अश्विनी भि़डे आणि एएआयच्या प्रमुख के. हेमलता यांनी देखील वृक्षारोपण केले.

प्रत्येक व्यक्तीने जर एक झाड लावलं, तर नक्कीच पर्यावरण संरक्षण होईल. विकासकामाच्या दृष्टीकोनातून अनेक झाडांची कत्तल करण्यात येत आहे. पण, दुसऱ्याच ठिकाणी अशाप्रकारे झाडांचे पुनर्वसन करण्यात येत आहे, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.

Loading Comments