रविवारी ‘मुंबई अल्ट्रा मॅरथॉन’

 Dadar
रविवारी ‘मुंबई अल्ट्रा मॅरथॉन’

मुंबईत रविवारी 13 ऑगस्ट रोजी 'मुंबई अल्ट्रा मॅरेथॉन' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा कोणत्याही संस्थेने आयोजित केलेली नाही, तर स्वत: मुंबईकरांनीच ही स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये शिवाजी पार्कच्या काही हौशी धावपटूंचा समावेश आहे. गेल्या 2 वर्षांपासून या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे.

रविवारी पहाटे 5 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही मॅरेथॉन सुरू राहणार आहे. शिवाजी पार्क येथील वीर सावरकर स्मारक येथून या मॅरेथॉनला सुरुवात होणार असून, एकूण 11 किमी आणि 12 तासांची ही मॅरेथॉन असणार आहे. यामध्ये 18 वर्षांवरील स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.


असा असेल मॅरेथॉनचा मार्ग

  • वीर सावरकर स्मारकापासून सिद्धिविनायक
  • जुने पासपोर्ट कार्यालय - सासमिरा
  • वरळी सी फेस - वरळी डेअरी
  • शिवाजी पार्क वीर सावरकर स्मारक येथे समाप्तहेही वाचा -  

मुंबई मॅरेथॉनचे प्रायोजकत्व टाटा समुहाकडे

एक मॅरेथॉन अशीही!


Loading Comments