मुंबई - केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. मुंबईकरांमध्ये गायक अनुराधा पौडवाल, गायक कैलाश खेर, ज्येष्ठ पत्रकार भावना सोमेय्या आणि प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय क्रिकेटपटू विराट कोहली, ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारी साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.