Advertisement

रस्त्यावर रंगली राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा


रस्त्यावर रंगली राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा
SHARES

शुक्रवारी गिरगावमध्ये ठिकठिकाणी मुले रस्त्यावर बसून चित्र काढत होती. कोणी जुन्या इमारतीवर, तर कोणी रस्त्यावर आणि काहीजण गटाराच्या टाकीवर, तर कोणी फूटपाथच्या किनारी बसून चित्र रंगवताना दिसत होते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या सर्वांचे लक्ष या मुलांकडेच होते.



ही राज्यस्तरीय लँडस्केप स्पर्धा दरवर्षी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने घेतली जाते. कला विद्या संकुल पॉलिटेक्निकतर्फे आयोजित या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाते. प्रथम येणाऱ्या विजेत्यास 5 हजार, द्वितिय क्रमांक मिळवणाऱ्यास 4000 आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला 3 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाते.



आपली कला सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी हा एक उत्तम मंच आहे. ही स्पर्धा सोमवारी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होती. या स्पर्धेत एकूण २४७ स्पर्धकांनी भाग घेतला होता. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता या राज्यस्तरीय लँडस्केप स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ पार पडेल.

तुषार शेट्टी, स्पर्धक





हेही वाचा - 

मुलांसाठी उन्हाळी चित्रकला प्रशिक्षण शिबीर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा