रविवारी पार्ले महोत्सवाचा शुभारंभ

 Andheri
रविवारी पार्ले महोत्सवाचा शुभारंभ

विलेपार्ले - विलेपार्ल्यात गेल्या 16 वर्षांपासून साजरा होणारा पार्ला महोत्सव यंदा 17 व्या वर्षांत पदार्पण करतोय. लोकप्रिय असलेल्या या पार्ला महोत्सावाचा शुभारंभ रविवारी 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता आमदार पराग अळवणी आणि नगरसेविका ज्योती अळवणी यांच्या हस्ते पार पडणार आहे. पार्ले महोत्सवात 22 स्पर्धा प्रकार व 60 हजारांहून अधिक स्पर्धकांचा यावर्षी समावेश आहे. विलेपार्ले येथील वामन दुभाषी आणि साठे महाविद्यालयात या स्पर्धा पार पडणार आहेत. पार्ले महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिक विविध स्पर्धात सहभागी होतात.

Loading Comments