Advertisement

'दादर सांस्कृतिक मंच'तर्फे फोटो वॉकचं आयोजन


'दादर सांस्कृतिक मंच'तर्फे फोटो वॉकचं आयोजन
SHARES

सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या दादरची ओळख तशी काही सांगण्याची गरज नाही. शिवसेना भवन, शिवाजी पार्क, शिवाजी नाट्य मंदिर अशी अनेक ठिकाणं दादरची ओळख आजही स्पष्टपणे सांगतात. पण ही मोजकी नावं सोडली तर दादरमधली किती ठिकाणं आहेत ज्या बद्दल तुम्हाला माहीत आहे? नक्कीच खूप कमी मुंबईकरांना दादरच्या खाणा-खुणा माहीत असतील. माहिती सोडा, या स्थळांचे साधे फोटो देखील शोधल्यावर सापडणार नाहीत. मुंबईकरांचं काय घेऊन बसलात? ज्याला सर्व माहीत आहे त्या गुगललासुद्धा एवढं दादर माहीत नाही. गुगलवर दादर टाकलं की बोटांवर मोजण्याइतके तुरळक फोटो येतात.

सौजन्य

दादरला मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार म्हटलं तरीही त्यात काही वावगं नाही ठरणार. हाच विचार करुन दादर सांस्कृतिक मंचाचर्फे हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. या वॉकसाठी तुमचा कॅमेरा रेडी ठेवा. कारण हेरिटेज वॉकसोबतच फोटो वॉकचंही आयोजन करण्यात आलं आहे. ऐतिहासिक स्थळांचे फोटो काढण्याची संधी या उपक्रमाद्वारे मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. हेच फोटो दादरची ओळख म्हणून संग्रहित करण्यात येणार आहेत. प्रभादेवी ते माहिम अशा फोटो वॉकमध्ये तुम्हाला ऐतिहासिक स्थळांपासून ते जुन्या इमारतींपर्यंत सर्वांची माहिती देण्यात येणार आहे. फक्त माहिती नाही, तर फोटोच्या माध्यमातून दादर अधोरेखित करण्यात येणार आहे.

दादर सांस्कृतिक मंचाद्वारे आयोजित हा फोटो वॉक १६ जुलैला म्हणजेच रविवारी आयोजित करण्यात आला आहे. जर या फोटो वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल, तर दादर सांस्कृतिक मंचच्या फेसबुक पेजवर जाऊन नोंदणी करणं आवश्यक आहे. ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांनी रविवारी सकाळी ७.३൦ वाजता शिवाजी पार्क इथल्या समर्थ व्यायाम मंदिर येथे एकत्र यायचं आहे. त्यानंतर ग्रुप केले जातील. मग हेरिटेज वॉकला सुरुवात केली जाईल.

तुषार देशमुख, सदस्य, दादर सांस्कृतिक मंच

या फोटो वॉकमध्ये शिवाजी पार्क, हिंदू कॉलनी, पारसी कॉलनी, फुल मार्केट अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे. दादरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आता फोटोंच्या माध्यमातून अधोरेखित करायचा आहे.

मग वाट कसली बघताय? घरात धूळ खात पडलेला कॅमेरा साफ करा आणि रविवारी तुमची फोटोग्राफी दाखवायला रेडी राहा!




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा