चित्रकलेतून पर्यावरण रक्षणासाठी चिमुकल्यांनी केली जनजागृती

 Parel
चित्रकलेतून पर्यावरण रक्षणासाठी चिमुकल्यांनी केली जनजागृती

पर्यावरण कसे जोपासता येईल यावर आधारित चित्र रेखाटून चिमुकल्यांनी सर्वसामान्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यात वाडिया रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 25 मुलांनी सहभाग घेतला होता. मुलांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन रुग्णालय परिसरात 50 नवीन रोपट्यांची लागवड देखील केली.

5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन असल्याने त्याचेच औचित्य साधून वाडिया रुग्णालय आणि गो एअर यांच्या वतीने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाडिया रुग्णालयाच्या कार्यकारी प्रमुख डाॅ. मिनी बोधनवाला तसेच रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते.

Loading Comments