Advertisement

बिग बॉसमध्ये रंगला प्रश्नोत्तराचा डाव

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता प्रश्नोत्तराचा डाव रंगणार आहे. या घरात पत्रकार जाणार असून, सदस्यांना त्यांच्या कृत्याचा, त्याच्या वागणुकीबद्दलचा जाब विचारणार आहेत. पत्रकारांच्या या बेधडक प्रश्नांची सदस्य कशी आणि काय उत्तर देतील ते पहायचं आहे.

बिग बॉसमध्ये रंगला प्रश्नोत्तराचा डाव
SHARES

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचा प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. त्यामुळं या सिझनचा विजेता किंवा विजेती होण्याचा मान कोण मिळेल? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असून, जो तो याचं उत्तर शोधण्यात दंग आहे. असाच प्रश्नोत्तराचा डाव बिग बॉसच्या घरातही रंगल्याचं पहायला मिळणार आहे.


घरात पत्रकार जाणार

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे येत्या रविवारी म्हणजेच १ सप्टेंबरला समजणार आहे. तोपर्यंत मात्र रसिकांना घरात काय चाललंय त्याचा आनंद लुटायचा आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता प्रश्नोत्तराचा डाव रंगणार आहे. या घरात पत्रकार जाणार असून, सदस्यांना त्यांच्या कृत्याचा, त्याच्या वागणुकीबद्दलचा जाब विचारणार आहेत. पत्रकारांच्या या बेधडक प्रश्नांची सदस्य कशी आणि काय उत्तर देतील ते पहायचं आहे.


शिव वीणाच्या हातातलं बाहुलं?

घरामध्ये सगळ्यांचा लाडका, प्रेम मिळवणारा शिव वीणाच्या हातातलं बाहुलं बनला आहे का? या प्रश्नावर काय असेल शिवचं उत्तर? तर शिवानीला विचारण्यात आलं तू खरोखरच तिकीट टू फिनालेसाठी पात्र होतीस का? यावर शिवानीचं उत्तर ‘हो मी पात्र होते’ असं दिलं आणि तिनं तिची बाजू कशी मांडली हे समजेल. बाहेरच्या सदस्यांनी दया करून दोघींना तिकीट टू फिनाले दिल्याचं वीणाचं विधान घरातील इतर सदस्यांना अपमानास्पद वाटलं का? यावर वीणाचं काय म्हणणं आहे? आणि इतर सदस्यांनी याचं काय उत्तर दिलं तेसुद्धा पहायला मिळणार आहे.हेही वाचा -

दशकानंतर संजय-मनिषा पुन्हा एकत्र

आयुष्मान-रितेशला लागली दादा कोंडकेंच्या ‘ढगाची कळ…’

ईद २०२० ला अक्षय फोडणार ‘लक्ष्मी बाॅम्ब’संबंधित विषय
Advertisement