
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या अतिथी देवो भव: हे साप्ताहिक कार्य सुरू आहे. या टास्कसाठी घरामध्ये पहिल्या पर्वातील सदस्य पुष्कर, सई, शर्मिष्ठा आणि स्मिता हे गेस्ट बनून आले आहेत. आता हे गेस्ट घरातील सदस्यांना वेगवेगळे टास्क देत आहेत. त्यांनी दिलेले टास्क घरातील सदस्य चतुराईनं कसे पूर्ण करतील आणि स्टार मिळवतील हे कळेलच. घरामध्ये आलेले गेस्ट हे पहिल्या पर्वातील अतिशय हुशार सदस्य आहेत. प्रत्येक टास्क कुशलतेनं आणि बुद्धीचा वापर करून जिंकलेले आहेत. हेच सदस्य टास्क दरम्यान काही स्ट्रटेजी वापरणार आहेत.
एकमेकांच्या टीमना दोषआज पुष्कर साखर, चहा पावडर आणि मिठाची बरणी लपवताना दिसणार आहे. आता अचानक या बरण्या कुठे गेल्या असा प्रश्न सदस्यांना पडणं अगदी सहाजिक आहे. घरातील सदस्य एकमेकांच्या टीमना दोषी ठरवून तुम्हीच या बरण्या लपवल्या असं देखील म्हणू शकतील ? या दरम्यान आणखी एक गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे, बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये सई दुसरी वाइल्ड कार्ड स्पर्धक असल्याचं बिग बॉस जाहीर करणार आहेत. हे ऐकून घरातील सदस्य आणि सई खूप खुश आहेत. सईनं बिग बॉसचे आभार देखील मानले आहेत.
टीमसाठी स्टारशर्मिष्ठाचा चष्मा स्विमिंग पूलमध्ये पडला आहे आणि तिला तो दिसत नाही. कुठे गेला माहिती नाही. जो सदस्य तो चष्मा पहिला आणून देणार त्याला एक स्टार मिळेल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं शिव आणि अभिजीत केळकर स्विमिंगपूलमध्ये उतरले आहेत. स्मिताचं म्हणणं आहे की, त्यांना त्यांचा युनिफॉर्म काढू देत आणि पाण्यामध्ये उतरू देत, पण सई म्हणाली ती आपली समस्या नाही. अभिजीतही तिकडे आला आणि तोही पाण्यात उतरला. स्मिताचं म्हणणं होतं की, हा टास्क मी शिवला देणार होते. आता बघूया कोणता सदस्य आपल्या टीमसाठी स्टार पटकावणार?

हेही वाचा -
४९ वर्षांनंतर महिला अर्थमंत्री सादर करणार अर्थसंकल्प
आम्ही मध्य रेल्वेला पावसाचा इशारा दिलाच नव्हता- हवामान खातं
