Advertisement

आम्ही मध्य रेल्वेला पावसाचा इशारा दिलाच नव्हता- हवामान खातं

बुधवारी हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालविण्याचा निर्णय घेतला. परंतु, हवामान खात्यानं आपण मुसळधार पावसाचा इशारा दिलाच नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आम्ही मध्य रेल्वेला पावसाचा इशारा दिलाच नव्हता- हवामान खातं
SHARES

मुंबईत सलग ५ दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळं रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्या वाहतूक ठप्प झाली होती. अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळं मध्य रेल्वेनं गाड्याही रद्द केल्या होत्या. तसंच राज्य सरकारनं मंगळवार २ जुलै सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला. या सुट्टीनंतर बुधवारी हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालविण्याचा निर्णय घेतला. परंतु, हवामान खात्यानं आपण मुसळधार पावसाचा इशारा दिलाच नसल्याचं स्पष्ट केलं आहे

मुसळधार पाऊस नाही

भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक केएसहोसाळीकर यांनी ट्विट करत मुंबईत मुसळधार पावसाचा इशाराच दिला नसल्याचं बुधवारी संध्याकाळी स्पष्ट केलं आहे. सर्व संबंधित यंत्रणांना ३ जुलै रोजी मुसळधार पाऊस होणार नसल्याचं कळवण्यात आलं होतं, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्याशिवाय, अधिक माहितीसाठी त्यांनी हवामान खात्याच्या वेबसाइटला भेट देण्याचं आवाहन केलं.

रविवारचं वेळापत्रक

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्य रेल्वेनं रविवारचं वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गर्दी सरल्यानंतर मध्य रेल्वेनं रविवारचं वेळापत्रक मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, या कालावधीत कामाला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. प्रचंड गर्दीमुळं महिला प्रवासी लोकलमधून पडल्याचा प्रकार घडला होता. तर काही महिलांना चक्कर आल्याच्या घटना घडल्या. अखेर दुपारी मध्य रेल्वेनं रविवारचं वेळापत्रक रद्द केल्याचं जाहीर केलं.



हेही वाचा -

वंचित पुढे काँग्रेसच वंचित? ४० जागांचा प्रस्ताव देऊन केली थट्टा

Video: मुसळधार पावसात मुंबईची वाताहात, म्हणून राज ठाकरेंचं 'हे' वक्तव्य ठरतंय महत्त्वाचं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा