Advertisement

Video: मुसळधार पावसात मुंबईची वाताहात, म्हणून राज ठाकरेंचं 'हे' वक्तव्य ठरतंय महत्त्वाचं

शहराचं योग्य नियोजन करणाऱ्या नेतृत्वाची जनसामान्यांना किती गरज आहे, हे अधोरेखीत करणारा व्हिडिओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकला आहे.

Video: मुसळधार पावसात मुंबईची वाताहात, म्हणून राज ठाकरेंचं 'हे' वक्तव्य ठरतंय महत्त्वाचं
SHARES

अवघे ३ दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहरात दाणादाण उडवून दिली. जागोजागी पाणी साचलं, लोकल ट्रेन, रस्ते वाहतूक ठप्प झाली. ठिकठिकाणी मुंबईकर अडकले. सार्वजनिक सेवा सुविधांचा अक्षरश: बोजवारा उडाला. तसंच या सेवा पुरवणारे प्राधिकरण जसं मुंबई महापालिका, एमएमआरडीए आणि राज्य सरकारच्या नगर नियोजन खात्याचं अपयश प्रकर्षानं समोर आलं. अशा परिस्थितीत शहराचं योग्य नियोजन करणाऱ्या नेतृत्वाची जनसामान्यांना किती गरज आहे, हे अधोरेखीत करणारा व्हिडिओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकला आहे.

हा व्हिडिओ मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा असून त्यात राज शहर नियोजनावर नेमकेपणानं बोलताना दाखवण्यात आलं आहे. राज यांची ही मुलाखत ‘मुंबई लाइव्ह’ने लोकसभा निवडणुकीदरम्यान घेतली होती.    


या मुलाखतीत राज यांनी ब्ल्यू प्रिंट, वाढत्या लोंढ्यामुळे मुंबईसोबत इतर शहरांवर पडणारा ताण, नगरनियोजनाचं व्हिजन असलेलं नेतृत्व आणि मुख्यमंत्री पदापेक्षाही शहराचा विकास करण्याला असलेलं प्राधान्य यावर भाष्य केलं आहे. दर पावसाळ्यात मुंबई शहराची होणारी वाताहत बघता शहर नियोजनाला किती महत्त्व दिलं पाहिजे, हे यावरून स्पष्ट होतं.  


 


हेही वाचा-

मालाड दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस

उशीरा सुचलं शहाणपण, रविवारचं वेळापत्रक रद्द, ठाण्यात चेंगराचेंगरीत २ महिला बेशुद्ध



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा