Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,44,710
Recovered:
56,85,636
Deaths:
1,16,026
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,807
666
Maharashtra
1,39,960
9,830

मालाड दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस

मालाड दुर्घटने प्रकरणी महापालिकेनं बुधवारी संरक्षक भिंतीचं बांधकाम केलेल्या कंत्राटदार 'अोमकार इंजीनियर्स आणि कॉन्ट्रेक्टर्स' याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मालाड दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस
SHARES

मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर २० फूट भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला असून, ७० जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी महापालिकेनं बुधवारी संरक्षक भिंतीचं बांधकाम केलेल्या कंत्राटदार 'अोमकार इंजीनियर्स आणि कॉन्ट्रेक्टर्स' याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याशिवाय, या दुर्घटनेप्रकरणी महापालिका कंत्राटदारावर एफआयआर दाखल करण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे.

भिंतीवर दबाव

मलाड येथील या संरक्षक भिंतीचं बांधकाम नोव्हेंबर २०१७मध्ये करण्यात आलं होतं. त्यानुसार हे बांधकाम फक्त एकच पावसाळा टिकलं असून दुसऱ्या पावसाळ्यात ही संरक्षक भिंत कोसळली आहे. या प्रकरणी कंत्राटदारानं पावसाचं पाणी जाण्यासाठी भिंतीवर एकही होल नव्हता. त्यामुळं मुसळधार पावसामुळं या भिंतीवर दबाव आल्यानं ती पडली असल्याचा असा आरोप येथील स्थानक रहिवाशांनी केला आहे.

उच्च स्तरीय चौकशी

या दर्घटनेनंतर महापालिकेनं या घटनेती चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय राज्य सरकारनं देखील या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी या घटनेची प्राथमिक चौकशी केली असता जलाशयातील पाण्यामुळं संरक्षक भिंतीवर दबाव आल्यानं ही भिंत कोसळल्याचं महापालिकेनं अहवालात म्हटलं आहे.हेही वाचा -

'त्या' ट्विटप्रकरणी राहुल गांधी शिवडी कोर्टात हजर राहणार

महापालिकेकडून चांदिवलीतील विकासकाला काम बंद करण्याची नोटीसRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा