Advertisement

'त्या' ट्विटप्रकरणी राहुल गांधी शिवडी कोर्टात हजर राहणार

मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल याचिकेवर गुरुवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीकरीता कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हजर राहणार आहेत.

'त्या' ट्विटप्रकरणी राहुल गांधी शिवडी कोर्टात हजर राहणार
SHARES

कर्नाटकच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचं ट्विट कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्विट प्रकरणी मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीकरीता राहुल गांधी गुरुवारी सकाळी मुंबईत दाखल होणार आहेत.

संघावर टीका

मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल याचिकेवर गुरुवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीकरीता कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हजर राहणार आहेत. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी संघावर टीका करणारे ट्विट केलं होतं. त्यामुळं न्यायालय या याचिकेवर काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

४ पानांचं राजीनामा पत्र

बुधवारी राहुल गांधी यांनी ४ पानांचं राजीनामा पत्र ट्विट केलं आहे. या ट्विटमुळं राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं म्हटलं.



हेही वाचा -

बेस्ट उपक्रमाच्या बसच्या भाडेकपातीला आरटीएची मंजुरी

महापालिकेकडून चांदिवलीतील विकासकाला काम बंद करण्याची नोटीस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा