Advertisement

बेस्ट उपक्रमाच्या बसच्या भाडेकपातीला आरटीएची मंजुरी

प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणानंही (आरटीए) बेस्ट उपक्रमाच्या भाडेकपातीवर बुधवारी शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं पुढील २ ते ३ दिवसांत बसभाड्याचे नवीन दर लागू होणार आहेत.

बेस्ट उपक्रमाच्या बसच्या भाडेकपातीला आरटीएची मंजुरी
SHARES

बेस्ट बसच्या नव्या भाडेदराच्या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. त्यानंतर पालिका महासभेच्या बैठकीतही या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. अशातच आता प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणानंही (आरटीए) बेस्ट उपक्रमाच्या भाडेकपातीवर बुधवारी शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं पुढील २ ते ३ दिवसांत बसभाड्याचे नवीन दर लागू होणार आहेत.

नवीन भाडेदराचा प्रस्ताव

प्रवासी व उत्पन्नवाढीसाठी बेस्ट उपक्रमानं नवीन भाडेदराचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार बेस्ट बस भाड्याच्या सुसूत्रीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला असून अधिसूचना येण्यासाठी व आणखी काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी २ ते ३ दिवस लागणार आहे. त्यानंतर त्वरित भाडेकपातीची अंमलबजावणी केली जाणार आहे.

किमान भाडे ५ रुपये

या प्रस्तावानुसार ५ किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे ५ रुपये निश्चित करण्यात आलं आहे. सध्या २ किलोमीटरसाठी ८ रुपये आकारले जातात. वातानुकूलित बसचंही किमान भाडं ६ रुपये असणार आहे. सध्या वातानुकूलित बसचं किमान भाडं १५ रुपये आहे. प्रस्तावात १५ कि.मी.पुढील प्रवासासाठी साध्या बसकरिता २० रुपये भाडं असून वातानुकूलितसाठी १५ कि.मी.पुढील प्रवासासाठी २५ रुपये भाडेदर होणार आहे.



हेही वाचा -

शिवनेरीच्या तिकीट दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा