चेंबूर हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

 Chembur
चेंबूर हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
चेंबूर हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
चेंबूर हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
See all

चेंबूर - शिक्षण निरीक्षण बृहन्मुंबई उत्तर विभाग, जिल्हा विज्ञान प्रदर्शन समिती आणि सहशालेय उपक्रम समिती आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या वतीनं चेंबूर हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे विज्ञान प्रदर्शन बुधवारपासून सुरु झाले असून शुक्रवारी याचा समारोप होणार आहे. प्रदर्शनातील बालवैज्ञानिक, शिक्षक यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांना प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शुक्रवारी या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप होणार असून शिक्षक आमदार कपिल पाटील, शास्त्रज्ञ नरेंद्र देशमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गिरीश राऊत हे याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

Loading Comments