Advertisement

ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सांडभोर यांचं निधन


ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सांडभोर यांचं निधन
SHARES

मुंबई - ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सांडभोर (42) यांचं सोमवारी निधन झालं. मागील काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान सोमवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातल्या तिन्हेवाडी या त्यांच्या मूळगावी पार्थिवावर अंत्यसंस्कार केलं जाणार आहेत.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पत्रकार मित्रांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी जे. जे. रुग्णालयात धाव घेतली. शशिकांत सांडभोर हे 'सी न्यूज' चॅनेलमध्ये अनेक वर्ष कार्यरत होते. त्यानंतर 'टीव्ही 9' सह अनेक वृत्तवाहिन्यांमध्येही ते कार्यरत होते. मुंबई मराठी पत्रकार संघाचेही ते सक्रीय पदाधिकारी होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा