Advertisement

पुराच्या विळख्यात सिध्दी आणि शिवाचं आयुष्य?

अतिवृष्टीमुळं आलेल्या पुरानं जसे वास्तवात अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त केले, तसेच कल्पनाविश्वातील काही संसारही उधळले. या विळख्यात छोट्या पडद्यावरील सिद्धी आणि शिवाचंही आयुष्य अडकलं आहे.

पुराच्या विळख्यात सिध्दी आणि शिवाचं आयुष्य?
SHARES

अतिवृष्टीमुळं आलेल्या पुरानं जसे वास्तवात अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त केले, तसेच कल्पनाविश्वातील काही संसारही उधळले. या विळख्यात छोट्या पडद्यावरील सिद्धी आणि शिवाचंही आयुष्य अडकलं आहे.


शूटिंग थांबलं

मागच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना महापुरानं वेठीस धरलं होतं. महापुरामुळं तेथे हाहाकार उडाला होता. जनजीवनही विस्कळीत झालं होतं. आता मात्र हे जिल्हे पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यासाठी तसा प्रयत्न देखील सुरू आहे. सांगलीमध्ये कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे, येथील पूर परिस्थितिमुळं शूटिंग थांबावावं लागलं होतं; परंतु मालिकेचे कलाकार आणि संपूर्ण युनिट सुरक्षित जागी होतं.


१९ ऑगस्टपासून नवे भाग

गेल्या आठवड्यातील पूरस्थिती लक्षात घेता चित्रीकरण होऊ शकलं नाही. या आठवड्यामध्ये काही भागांचं पुन:प्रक्षेपण करण्यात आलं; पंरतु येत्या सोमवारपासून म्हणेजच १९ ऑगस्टपासून मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. आपले आवडते कलाकार सिध्दी – शिवा परत येत आहेत मालिकांच्या नव्या भागांसोबत, नव्या घटना घेऊन... शिवा आणि सिध्दीचं नातं कोणतं वळण घेईल? सोनला त्यांच्या नात्याबद्दल कळेल? सोनलच्या शिक्षणाची जबाबदारी पुन्हा सिध्दी घेईल की सिध्दीच्या सांगण्यावरुन शिवा सोनलसाठी दुसरा शिक्षक आणेल ? शिवाच्या चांगले वागणयामागचे कारण सिद्धीला कळेल ?



हेही वाचा  -

Movie Review: 'मंगळ' ग्रहाच्या प्रवासाची 'सुमंगल' कहाणी

मराठी कलाकारांचा राष्ट्राभिमान! राष्ट्रगीतासाठी एकवटले ७५ तारे




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा